महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडीची स्थानिक निवडणुकांसाठी युती

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आगामी सर्व नागरी निवडणुका एकत्रित लढवणार आहेत. मुंबईत एका संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, त्यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांचे आजोबा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समकालीन होते आणि दोघांनीही समाजातील वाईट प्रथा नष्ट करण्यासाठी काम केलं आहे. मुंबई, ठाणे, पुणे या महानगरपालिकांसह अनेक महानगरपालिकांचा कार्यकाळ गेल्या वर्षी संपला आहे. कोविड-19 महामारी ओसरल्यामुळं या निवडणुका लवकरच होण्याची शक्यता आहे.