अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या १०८व्या अधिवेशनाला प्रधानमंत्री संबोधित करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय विज्ञान काँग्रेसच्या एकशे आठाव्या अधिवेशनाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत. शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठात उद्यापासून हे अधिवेशन  सुरु होणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने शाश्वत विकासासाठी ज्ञान आणि तंत्रज्ञान अशी यंदाच्या अधिवेशनाची विषय संकल्पना आहे.

बाल विज्ञान काँग्रेस आणि शेतकरी विज्ञान काँग्रेसचं आयोजनही  या अधिवेशनात करण्यात आलं आहे.  विज्ञान तंत्रज्ञान क्षेत्रातलं महिलांचं योगदान या विषयावर होणाऱ्या विशेष कार्यक्रमात मान्यवर महिला वैज्ञानिकांची व्याख्यानं होणार आहेत.

Popular posts
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कार्यक्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान - निबंध, चित्रकला, घोषवाक्य स्पर्धा
Image
जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून मुंबई आणि महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन
Image
स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कृतज्ञतापूर्वक वंदन
Image
राज्यातील कामगारांच्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती - कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांची माहिती
Image
भारतानं सादर केलेल्या अजेंड्याला सदस्य देशांची प्राथमिक पातळीवर सहमती
Image