मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियानाला पुन्हा सुरूवात

 


मुंबई (वृत्तसंस्था) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान पुन्हा सुरू केलं आहे. नुकत्याच झालेल्या सर्वेक्षणातून असं दिसून आले आहे की राज्यातील सुमारे १४ लाख लोकांना या शस्त्रक्रियांची गरज आहे. यानुसार पुढील दोन वर्षांत सुमारे १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. कोविड-१९ साथीच्या आजाराच्या आगमनानंतर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया बंद कराव्या लागल्या होत्या. या मोहिमेचे मुख्य प्रवर्तक म्हणून शासनानं प्रसिद्ध नेत्रतज्ज्ञ, पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची नियुक्ती केली आहे. वैद्यकीय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे शस्त्रक्रियांचे वेळापत्रक आणि आयोजन केलं जाईल.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image