प्रवासी भारतीयांना जागतिक व्यवस्थेमधली भारताची भूमिका मजबूत करण्याचं आणि वेगळा जागतिक दृष्टीकोन प्रस्थापित करण्याचं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) प्रवासी भारतीयांनी भारताचा आगळा वेगळा  जागतिक दृष्टिकोन आणि जागतिक व्यवस्थेमधली आपली भूमिका मजबूत करावी असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज मध्यप्रदेशमध्ये इंदोर इथं प्रवासी भारतीय दिनाचं औपचारिक उद्घाटन करताना बोलत होते. प्रवासी भारतीय हे मेक इन इंडिया, योग आणि आयुर्वेद, भारताचा कुटिरोद्योग, हस्तकला आणि भारताच्या भरड धान्यांचे ब्रँड अँबॅसेटर असल्याचं मोदी यांनी यावेळी सांगितलं.

गयानाचे राष्ट्राध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून, तर सुरिनामचे अध्यक्ष चंद्रिकाप्रसाद संतोखी विशेष पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘प्रवासी: अमृत काळातले भारताच्या प्रगतीचे विश्वासार्ह भागीदार’ ही या परिषदेची संकल्पना आहे. या परिषदेचा उद्या समारोप होणार असून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाला संबोधित करतील आणि प्रवासी भारतीय सन्मान प्रदान करतील.