सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध केले जाणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याबाबत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या विचाराचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केलं आहे. हा एक प्रशंसनीय विचार असून यामुळे अनेकांना, विशेषतः तरुणांना मदत होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे.

नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात, न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे निकाल प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध करून देण्याच्या दिशेने काम करण्याची गरज व्यक्त केली होती.