श्रीलंकेत कोलंबो इथं ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीलंकेतल्या कोलंबो इथं भारतीय उच्च आयोगानं चौऱ्ह्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त रॉक बँड संगीत सोहळ्याचं आयोजन केलं आहे. भंडारनायके स्मारकातल्या आंतरराष्ट्रीय संमेलन हॉल इथं होत असलेल्या नागालँडच्या यूडीएक्स बँड आणि श्रीलंकेच्या स्टिगमटा बँडनं या सद्भावना संगीत कार्यक्रमात सहभाग घेतला.श्रीलंकेचे  राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे आणि श्रीलंका सरकारमधले अनेक मंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते. दोन्ही देशात लोकशाही आणि विविधतेत समानता आजही अस्तित्वात आहे, असं भारतीय उच्चायुक्त गोपाल बागले यांनी या कार्यक्रमात बोलताना सांगितलं. भारतीय मिशन आणि कोलंबो इथल्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रानं या संगीत सोहळ्याचं आयोजन केलं होतं. 

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image