वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं शरद पवार यांची स्पष्टोक्ती

 


मुंबई (वृत्तसंस्था) : वंचित बहुजन आघाडी सोबत आम्ही कोणतीही चर्चा केली नसून याबाबत भूमिका स्पष्ट झाली नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज कोल्हापूरात बातमीदारांशी बोलत होते. आगामी निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत असं ते म्हणाले. तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात असून जनतेच्या अधिकारांवर गदा आणली जात आहे अशी टीका पवार यांनी केली. 'मूड ऑफ नेशन'च्या सर्वेक्षणानुसार लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला राज्यात ३४ जागांवर विजय मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असल्याची माहिती त्यांनी दिली. इंडिया टुडे आणि सी व्होटरनं यापूर्वी केलेली सर्वेक्षणे अचूक ठरली आहेत असं पवार यांनी सांगितलं.