राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार- उत्पादन शुल्क मंत्री

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काजू प्रक्रिया उद्योगासाठी उत्पादकांना सहकार्य करणार असल्याचं उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं ते काल मंत्रालयात याविषयी आयोजित बैठकीत बोलत होते. कोकणात काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं. काजू बोंडापासून उपउत्पादनं, तसंच वाईन तयार करण्याचं प्रमाण कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काजू बोंडांची विक्री इतर राज्यात करावी लागते.

आपल्याच राज्यात यावर प्रक्रिया केली तर शेतकऱ्यांना याचा फायदा होईल, असं ते म्हणाले. उपपदार्थाच्या उत्पादन आणि विक्रीसंदर्भात उत्पादकांना येणाऱ्या अडचणीबाबतही पाठपुरावा करणार असल्याचं देसाई यांनी सांगितलं.