कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करणार - अनुराग ठाकूर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कुस्ती महासंघाशी संबंधित वादाची निष्‍पक्ष चौकशी करण्याचं आश्वासन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना दिलं आहे. या आश्वासनानंतर कुस्तीपटूंनी नवी दिल्ली इथं सुरु असलेलं आपलं आंदोलन मागे घ्यायचा निर्णय घेतला.

खेळाडूंचं लैंगिक शोषण, महासंघात आर्थिक आणि प्रशासकीय कामकाजातली अनियमितता या आरोपांच्या चौकशीसाठी एक समिती स्थापन केल्याचं त्यांनी सांगितलं. ही समितीनं चार आठवड्यात आपला चौकशी अहवाल सादर करणार असल्याची माहिती ठाकूर यांनी दिली आहे.