प्रधानमंत्री स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अहमदाबाद इथे होत असलेल्या  प्रमुख स्वामी महाराज जन्मशताब्दी महोत्सवाच्या उदघाटन सोहळ्याला उपस्थित राहतील.  अहमदाबादच्या  बीएपीएस स्वामी नारायण मंदीर इथे उद्यापासून जन्मशताब्दी सोहळ्याचे कार्यक्रम सुरु होत आहेत. उद्यापासून महिनाभर हे कार्यक्रम चालतील. त्यासाठी जगभरातून भाविक आणि महाराजांचे शिष्य येथे जमा होत आहेत. या कार्यक्रमासाठी 600 एकर जमिनीवर प्रमुख स्वामीनगर वसवण्यात आलं आहे.