केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी घेतला अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल औषध निर्माण कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन अत्यावश्यक औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.  चीन सह काही देशात कोविडचा संसर्ग पुन्हा वाढतो आहे; त्या पार्श्वभूमीवर जागतिक पुरवठा साखळीच्या सद्य स्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी औषध कंपन्यांना दिले.

दरम्यान येत्या 1 जानेवारीपासून चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, हॉंगकॉन्ग  आणि थायलंडमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी आरटीपीसीआर चाचणी अनिवार्य करण्यात आली आहे.संबधित देशातील प्रवाशांनी प्रवासापूर्वीच्या 72 तासात केलेल्या आरटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल एअर सुविधा पोर्टलवर अपलोड करावा असे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिले आहेत.