अमेरीकेचे माजी राष्‍ट्रपति डोनाल्‍ड ट्रम्‍प एकूण १७ प्रकरणांमध्ये दोषी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरीकेचे माजी राष्‍ट्रपति डोनाल्‍ड ट्रम्‍प यांच्या व्यावसायिक संस्थेला षडयंत्र रचणं तसंच खोटे व्यवहार करणं या दोन प्रकरणांसह एकूण १७ प्रकरणांमध्ये न्यूयॉर्कच्या परीक्षकांनी दोषी ठरवलं आहे.

मॅनहॅटन इथल्या महाअधिवक्ता  कार्यालयानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापारी व्यवहारांची गेली तीन वर्ष चौकशी केली असून त्यांच्यावर अद्याप व्यक्तिगत आरोप ठेवण्यात आलेले नाहीत. ट्रम्प यांनी जानेवारी २०२१ ला राष्ट्रपती पद सोडल्यानंतर त्यांच्या सरकारी दस्तऐवजांची कसून तपासणी अमेरिकेच्या न्यायविभागाकडून सुरु होती.

त्याचबरोबर २०२० मधल्या राष्ट्रपती निवडणुकांचे निकाल बदलण्यासाठी त्यांनी केलेल्या कथित घोटाळ्याची देखील चौकशी सुरु आहे.