आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

 


पुणे : पुण्यातल्या कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत आज दुपारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तत्पूर्वी आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास केसरीवाडा इथल्या निवासस्थानी मुक्ता टिळक यांचे पार्थिव अंत्यदर्शना करीता ठेवण्यात आलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन,  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दरेकर, आदी मान्यवरांनी त्याचं अंत्यदर्शन घेतलं. 

मुक्ताताईंनी भारतीय जनता पक्षासाठी गेली ३० वर्षे समर्पित वृत्तीने काम केलं, त्याचं पक्षाच्या कार्यात मोठ योगदान आहे. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आदरांजली वाहिली. 

दरम्यान, पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्यावर दिनानाथ मंगशेकर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संपर्कमंत्री चंद्रकांत पाटील आज रुगणालयात जाऊन त्यांची भेट घेतली.