२०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धा भारतात व्हाव्या यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत २०३६ मध्ये ऑलिम्पिक खेळांचं आयोजन करण्यासाठी बोली लावेल असं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आहे. पुढच्या वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक्स समितीच्या अधिवेशनादरम्यान सदस्यांसमोर भारत याबाबतचा एक आराखडा सादर करेल. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत ठाकूर यांनी सांगितलं की, भारतीय ऑलिम्पिक्स संघटनेच्या बोलीला सरकार पाठिंबा देईल. गुजरातमध्ये आधीपासूनच जागतिक दर्जाच्या क्रीडा पायाभूत सुविधा आहेत आणि अहमदाबाद या खेळांसाठी 'यजमान शहर' असण्याची शक्यता आहे.

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image