वंदे भारत ट्रेनला जूनपासून आतापर्यंत ६८ जनावरं आदळण्याच्या घटना

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वंदे भारत ट्रेनला या वर्षीच्या जूनपासून आतापर्यंत जनावरं आदळण्याच्या ६८ घटना तर ब्रेक निकामी होऊन एक्सल लॉक झाल्याच्या एका घटनेची नोंद झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. अशा घटना या फायबर-प्रबलित प्लास्टिकमध्ये दोष असल्यामुळे घडत असल्याचं त्यांनी नाकारलं. सर्व साहित्याचा पुरवठा हा तपासणीनंतरच स्वीकारला जातो असं ते यावेळी म्हणाले.