सीबीएसईच्या १०वी आणि १२वीच्या परीक्षा १५फेब्रुवारीपासून होणार सुरू

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) सीबीएसई अर्थात केंद्रीय उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांचे तपशीलवार वेळापत्रक मंडळानं जाहीर केलं असून ते मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक तयार करताना जेईईसह स्पर्धा परीक्षांच्या वेळापत्रकाची दखल घेण्यात आली असल्याचं सीबीएसईनं म्हटलं आहे.