भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारची मंजुरी

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेकच्या नाकावाटे दिल्या जाणाऱ्या कोविड प्रतिबंधक लसीला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ही लस कोविन ऍपवर आजपासून उपलब्ध होणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लसी घेतलेलेही भारत बायोटेकची लस घेऊ शकतील, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.