राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी - मनसुख मांडविया

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान कोविड नियमांचं पालन करावं अन्यथा यात्रा स्थगित करावी असं आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं आहे.

यात्रेदरम्यान कोविड नियमांचं काटेकोर पालन करावं, मास्क आणि सॅनिटायझरचा वापर सुनिश्चित करावा, ज्यांचं लसीकरण झालं आहे त्यांनीच यात्रेत सहभागी व्हावं असं त्यांनी दोन्ही मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेसने या पत्रसंबंधी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image