महाराष्ट्र - कर्नाटक सीमावर्ती भागात एसटीची वाहतूक अंशत: रद्द

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेले काही दिवस महाराष्ट्र - कनार्टक सीमावर्ती भागात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, स्थानिक पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार एसटी महामंडळानं आपल्या, कर्नाटकात जाणा-या दैनदिन १ हजार १५६ फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या पुढची सूचना येईपर्यत अंशत: रद्द ठेवल्या आहेत. कोल्हापूर शहरातून सौंदत्ती येथे सुमारे ७ हजार भाविकांना घेऊन गेलेल्या १४५ एसटी गाड्या आज मध्यरात्रीपर्यत कोल्हापूरात सुखरुप दाखल होतील.

या बाबतीत आवश्यकता वाटला तर या गाड्यांना पोलीस संरक्षण देण्याचं आश्वासन कनार्टक पोलीस प्रशासनानं दिलं आहे. सोलापूर जिल्हयाच्या सीमावर्ती भागात कर्नाटकमधे गाणगापूर इथं दत्त जंयती निमित्त यात्रेसाठी एसटी महामंडळाकडून सोलापूर- अक्कलकोट- गाणगापूर या मार्गावर जादा वाहतूक केली जात आहे. तिथं कोणतंही विघ्न आलेलं नसून, यात्रा सुरळीत सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. 

Popular posts
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image