फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची नाना पटोले यांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : फोनटॅपिंग संदर्भात विधानसभेत चर्चा करण्याची मागणी काँग्रेस आमदार नाना पटोले यांनी केली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ती फेटाळली. याचा निषेध करत विरोधी पक्ष सदस्यांनी, सभात्याग केला.

निर्धारित कामकाज बाजूला सारुन अतिमहत्त्वाच्या बाबींवर चर्चा करण्याची तरतूद नियम ५७ मध्ये असल्याचं विरोधी पक्ष नेता अजित पवार यांनी सांगितलं. मात्र वारंवार मागणी करुनही अध्यक्षांनी परवानगी नाकरली याचा अर्थ अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत आहेत असा आरोप करुन पवार सभागृहाबाहेर पडले. इतर विरोधी सदस्यांनीही त्यांच्याबरोबरच सभात्याग केला.