न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून घेतली शपथ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या शपथविधी समारंभात न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांना शपथ दिली. न्यायमूर्ती दत्ता यांच्या नियुक्तीमुळे सर्वोच्च न्यायालयात आता २८ न्यायाधीश असतील. न्यायमूर्ती दत्ता यांचा कार्यकाळ ८ फेब्रुवारी २०३० पर्यंत असेल.