राज्यात सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नाही - दीपक केसरकर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारने सरकारी शाळा बंद करण्याबाबत कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं.

सरकारी शाळा बंद करण्यासंबंधीचा कोणताही निर्णय सरकारनं घेतला नसून अशा निर्णयाचं परिपत्रक बनावट असल्याची माहिती केसरकर यांनी कनिष्ठ सभागृहातल्या लक्षवेधी प्रस्तावादरम्यान दिली. तसंच ५० टक्के शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची लवकरच भरती केली जाईल असंही ते म्हणाले.