सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे - डॉ.भारती पवार

 


मुंबई (वृत्तसंस्था) :  गावाच्या विकासातूनच राष्ट्रउभारणी होते गावपातळीवर काम करत असताना सरपंचानी कृतीशील विचार समोर ठेऊन काम केलं पाहिजे, असं मत केंद्रीय आरोग्य, कुंटूंब कल्याण राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांनी व्यक्त केलं. पुण्यात आज पवार यांच्या उपस्थितीत, एमआयटी-राष्ट्रीय सरपंच संसद, महाराष्ट्र राज्य पदाधिकारी अधिवेशन आणि नियुक्तीपत्र वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी त्या बोलत होत्या. गावाच्या विकासात सरपंचाची भुमिका महत्वाची असुन त्यांनी सर्वसामावेशी धोरणाने काम केलं पाहिजे, पंचायत ते संसद या प्रवासात सरपंच हे केवळ पद नाही तर तो सर्वसामान्यांचा विश्वास आणि सन्मान आहे, हे लक्षात घेतलं असं त्या म्हणाल्या.