अंधेरी पूर्वसह देशातल्या सात विधानसभा मतदार संघांमधल्या पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या सहा राज्यांमध्ये विधानसभेच्या सात जागांसाठी पोटनिवडणुका होत असून उद्या मतदान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या अंधेरी पूर्व मतदार संघातल्या एका जागेसह बिहारमध्ये दोन तर हरियाणा, तेलंगणा, उत्तरप्रदेश आणि ओडिशा राज्यात प्रत्येकी एक अशा एकूण सात जागांसाठी मतदान होईल. यासाठीची  मतमोजणी येत्या रविवारी होणार आहे.