इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, जयंत पाटील यांचं प्रतिपादन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : इतर मागासवगीर्गीय- ओबीसींना राजकीय आरक्षण मिळवूणं देणं ही शेतकरी कामगार पक्षाची बांधिलकी असल्याचं, पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. ते काल गडचिरोली इथं जाहीर सभेत ते बोलत होते. पेसा कायद्यामुळे आदिवासींना संरक्षण मिळालं आहे, मात्र ओबीसींवर वारंवार अन्याय केला जात आहे. त्याकडे केंद्र आणि राज्य शासन दुर्लक्ष करत असल्याचं पाटील म्हणाले.