जर्मनीचे महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 

मुंबई : जर्मनीचे मुंबईतील महावाणिज्यदूत अचिम फॅबिग यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे सदिच्छा भेट घेतली.

उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस आणि श्री. फॅबिग यांच्यादरम्यान यावेळी महाराष्ट्रातील गुंतवणुकीसंदर्भात चर्चा झाली. जर्मनीमधील उद्योजकांनी राज्यात अधिकाधिक गुंतवणूक करावी, राज्य शासनामार्फत त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

येत्या सहा महिन्यांत जर्मनीतील उच्चस्तरीय शिष्टमंडळ महाराष्ट्राला भेट देणार आहेत. या शिष्टमंडळाला राज्याच्या वतीने सहकार्य करावे, अशी अपेक्षा श्री. फॅबिग यांनी व्यक्त केली. त्यांचे राज्यात स्वागतच होईल, असे उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी आश्वस्त केले.