युजीसी नेट चा निकाल जाहीर करणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विद्यापीठ अनुदान आयोग, अर्थात युजीसी आज नेट चा निकाल जाहीर करेल. हा निकाल आज नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे जाहीर केला जाईल. एका ट्विटमध्ये UGC चे अध्यक्ष ममिदला जगदेश कुमार यांनी सांगितले की, डिसेंबर २०२१ आणि जून २०२२ मध्ये एकत्रित परिक्षा दिलेल्या उमेदवारांना त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख वापरून त्यांचा UGC NET २०२२ चा निकाल तपासू शकतील. निकाल NTA चे संकेतस्थळ - www.nta.ac. किंवा inugcnet.nta.nic.in आणि nta.nic.in.वर उपलब्ध असतील.