चालू आर्थिक वर्षात जेम व्यासपीठावर १ लाख कोटी रुपयांहून अधिक रकमेचे व्यवहार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रसरकारच्या जेम या ई-मार्केटप्लेस व्यासपीठानं 2022-2023 या आर्थिक वर्षात कालपर्यंत एक लाख कोटी रुपये  एकूण व्यापारी मूल्याचा टप्पा पार केला आहे. जेम हे भारतातल्या सार्वजनिक खरेदीसाठीचं एक ऑनलाइन व्यासपीठ असून, सरकारी खरेदीदारांसाठी खरेदीचं खुलं आणि पारदर्शक  व्यासपीठ उपलब्ध  करण्याच्या उद्देशानं  ऑगस्ट 2016 मध्ये ते सुरु करण्यात आलं होतं. भारतीय खरेदीदारांचा उत्साह आणि खरेदीमधली पारदर्शकता प्रदर्शित करण्यासाठी जेम हे गेम चेंजर ठरेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं होतं.