देशाचे ५०वे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड उद्या शपथ घेणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे पन्नासावे सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांचा शपथविधी उद्या होणार आहे. नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू  त्यांना पदाची शपथ देतील. 1959 मधे जन्मलेले न्यायमूर्ती चंद्रचूड 13 मे 2016 पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी ते अलाहाबाद उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते.