गेल्या महिन्यात पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

 


मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात झालेल्या पावसानं झालेल्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळानं घेतला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ऑक्टोबरमध्ये पावसामुळे प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ लाख हेक्टर जमिनीचे नुकसान झालं आहे. आम्ही महसूल आणि कृषी विभागाला निर्देश दिले होते, त्याप्रमाणे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगानं सुरू असून पंचनामे लवकरात लवकर संपावावेत असे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.