भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते छत्तिसगडचे १९९५ च्या प्रशासकीय सेवा तुकडीतले अधिकारी आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांची पाच वर्षांसाठी नियुक्ती केली आहे.

आकाशवाणी आणि दूरदर्शन हे प्रसारभारतीचे दोन घटक अजूनही सर्वाधिक विश्वासार्ह आणि विश्वसनीय ब्रॅण्ड मानले जातात आणि या दोन घटकांना अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असं त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितलं.  यावेळी आकाशवाणीच्या महासंचालक वसुधा गुप्ता, दूरदर्शनचे महासंचालक मयंक अगरवाल आणि इतर अधिकारी उपस्थित होते. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image