अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला  आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही स्पर्धा होण्याची शक्यता असून, तारखा लवकरच जाहीर होणार आहेत.

यंदा या स्पर्धेत ३४ जिल्ह्यांसह ११ महानगरपालिकांचे संघ सहभागी होणार असल्याची माहिती कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव शिंदे यांनी दिली. सर्व जिल्हा संघांना महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी संघ पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं असून, त्यासाठी जिल्ह्यांनी निवडचाचणी आयोजित केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.