१ डिसेंबर रोजी भारत स्वीकारणार जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या १ डिसेंबर रोजी भारत जी-२० समूहाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारणार आहे. या निमित्तानं गेल्या शनिवारी अंदमान निकोबार द्वीप समूहांमधील स्वराज द्वीपावर जी-२० च्या सदस्य देशांचे अभियान प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सदस्यांसाठी एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.

जी-२०चे शेर्पा अमिताभ कांत आणि मुख्य समन्वयक हर्षवर्धन श्रींगाला यांच्यासह ४० पेक्षा जास्त प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी उपस्थित सदस्य देशांचे प्रतिनिधी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसाठी विशेष माहिती सत्र आयोजित करण्यात आलं होतं. भारताच्या अध्यक्षतेखालची जी-२० परिषद सर्वसमावेशक, महत्वाकांक्षी, निर्णायक आणि कार्याभिमुख असेल, या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा बाली इथं नुकत्याच झालेल्या जी-२० संमेलनात अमिताभ कांत यांनी पुनरुच्चार केला होता.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image