अवकाळी पावसामुळे कांद्याच्या दरात वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : अवकाळी पावसामुळे चाळीतला साठवणीतला कांदा खराब झाल्यानं, आवक घटून कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. नवी मुंबईतल्या मुंबई कृषी णत्पन्न बाजार समितीच्या आवारातील कांदा बटाटा मार्केटमधील घाऊक बाजारात कांद्याचा दर २८ ते ३२ रूपयांपर्यंत पोहोचला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारातही होवून किरकोळ बाजारात दर ५० रूपयांपर्यंत वाढले आहेत.

सध्या बाजारात ९० ते १०० गाड्या कांद्याची आवक आहे. साधारण महिनाभरानं नवीन कांद्याची आवक सुरू झाल्यावर कांद्याचे दर खाली येण्याची शक्यता असल्याचं कांदा बटाटा मार्केटचे संचालक अशोक वाळुंज यांनी सांगितलं.