आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत शिव थापा अंतिम फेरीत दाखल, महिलांचे अंतिम सामने आज होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहा वेळा आशियाई पदक विजेता भारतीय मुष्टीयोद्धा शिवा थापा यानं, 2022 आशियाई एलिट मुष्टियुद्ध विजेतेपद स्पर्धेच्या साडेत्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ही स्पर्धा जॉर्डन मधील अम्मान इथं सुरु आहे.

सुमित आणि गोविंद कुमार साहनी उप-उपांत्य स्पर्धेत पराभूत झाल्यामुळे त्यांना कास्य पदकावर समाधान मानावं लागलं. आज होणाऱ्या स्पर्धेत भारताची लोवलीना बोर्गोहैन आणि परवीन यांची अनुक्रमे 75 किलो आणि 63 किलो वजनी गटात सुवर्ण पदकासाठी लढत होईल. आज संपणार्‍या महिलांच्या अंतिम सामन्यानंतर उद्या पुरुषांचे अंतिम सामने होणार आहेत. 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image