इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संघटना अर्थात इस्त्रो पुढच्या वर्षी जून महिन्यात चांद्रयान ३ प्रक्षेपित करण्याच्या तयारीत आहे. या यानामध्ये ग्रहांमधील संशोधनात महत्वपूर्ण असलेल्या अधिक शक्तीशाली लूनर रोवरही पाठवण्यात येणार आहे. या बरोबरच पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच गगनयान या पहिल्या मानवसहित अंतराळ मोहिमेची अबॉर्ट मिशनचीही तयारी सुरु आहे. इस्त्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या वर्षीच्या जून महिन्यात मार्क ३ या अंतराळयानातून चांद्रयान ३ चं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. २०२४ पर्यंत भारतीय अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्यासंबंधीही परिक्षण सुरु असल्याचंही त्यांनी सांगितलं. याआधी २०१९ च्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या मोहिमेत चांद्रयान २ ने पाठवलेला विक्रम लैंडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरू शकला नव्हता.