गडकिल्ल्यांचं संवर्धन करण्यासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातील गडकिल्ले हा ऐतिहासिक ठेवा असून त्यांचे संवर्धन करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दुर्ग प्राधिकरणाची स्थापना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक मध्ये केली. एका खासगी वृत्त वाहिनीच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरातील नाशिक रत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

२०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कार्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार तसेच नाशिक महापालिकेच्या सुनियोजित विकासाच्या दृष्टीने लवकरच नाशिक महानगर विकास प्राधिकरण आरखडा तयार करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.