राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २४ सुवर्णपदकांसह पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी आतापर्यंत २४ सुवर्ण, २२ रौप्य आणि ४३ कांस्य पदकांसह एकूण ८९ पदकांची कमाई केली आहे. ४१ सुवर्ण पदकांसह सेनादल पहिल्या आणि २५ सुवर्णपदकांसह हरियाणा दुसऱ्या स्थानी आहे. महिलांच्या एकेरी बॅडमिंटनमध्ये आकर्षी कश्यपनं अंतिम सामन्यात महाराष्ट्राच्या मालविका बनसोडला पराभूत केलं.