दसरा मेळावा शांततेत पार पडेल अशी उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही

 


मुंबई (वृत्तसंस्था) : ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर, तर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा बांद्रा-कुर्ला काँप्लेक्समधल्या एमएमआरडीए मैदानावर होणार आहे. दसरा मेळावा शांततेत पार पडावा यासाठी कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन काटेकोर करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना मुंबईत दिली.