महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतीशील राज्य - पियुष गोयल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील, औद्योगिक आणि वेगानं विकसित होणारं राज्य आहे; त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचं शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला.

मुंबईमध्ये आयोजित चौथ्या एनआयसीडीसी गुंतवणूकदार गोलमेज परिषदेमध्ये ते काल बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, विविध देशांचे वाणिज्य दूत आणि राज्यातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.केंद्र शासनाच्या सहकार्यानं राज्यात उद्योगवाढीसाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत. त्यामुळे जास्तीत-जास्त गुंतवणुकदारांनी गुंतवणुकीसाठी पुढे यावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं.