देशात आज १ लाख ९२ हजारापेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ३ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटीच्या वर गेली आहे. त्यात २१ कोटी ५३ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून ३ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ७२ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९२ लाख २४ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. दरम्यान, देशात काल नव्या दोन हजार १३९ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर तीन हजार २०८ रुग्ण बरे झाले. देशात सध्या २६ हजार २९२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.