प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची गुजरातमधल्या भरुचमध्ये पायाभरणी आणि लोकार्पण केलं. पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या स्थानी असलेला भारत आता ५ व्या स्थानी आला असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. अंकलेश्वरमध्ये उभं राहणार नवं विमानतळ गुजरातमधून निर्यात वाढवण्यात मोठी भूमिका बजावेल, असंही ते म्हणाले.