वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

 

मुंबई : जिल्हा सामान्य रूग्णालयात आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज  करण्यात आले.

यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार परिणय फुके यांच्यासह  जिल्हाधिकारी संदीप कदम, जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.दीपक सोयाम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.मिलींद सोमकुंवर उपस्थित होते.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियांतर्गत जिल्ह्यात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. यावेळी पालकमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात पाच दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना कार्ड वितरीत करण्यात आले. आरोग्य विषयक स्टॉलची पाहणी देखील पालकमंत्र्यांनी केली. चार दिवस चालणाऱ्या या आरोग्य शिबिरात आज पहिल्याच दिवशी एक हजारहून अधिक रूग्णांनी नोंदणी केली आहे.

Popular posts
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत थेट कर्ज योजना राबवली जाते
Image
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून जन सुनावणींच्या तारखा जाहीर
Image
देशात काल ३ लाख ४६ हजार ७८६ रुग्णांची नोंद
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी पिंपरी चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांचे मार्च महिन्याचे मानधन
Image