पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह जमा करण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना दिलेली मुदत संपली

 


मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना नव्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह सुचवण्यासाठी दिलेली मुदत आज संपली. यासाठी शिवसेना बाळासाहेब ठाकरे, शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यापैकी एक नावं द्यावं अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्रिशुळ, उगवता सूर्य किंवा मशाल यापैकी एक निवडणूक चिन्हं द्यावं असंही त्यांनी आयोगाला सुचवलं आहे. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत अजून अधिकृत माहिती दिलेली नाही.