महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा थायलंडच्या ८ षटकात ४ बाद २३ धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला भारताचा हा सहावा सामना आहे. गुणतालिकेत भारत आठ गुणांसह अव्वल स्थानावर आहे. गेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पराभव केला होता. थायलंडच्या संघानं पहिले दोन सामने गमावले. मात्र नंतर लागोपाठच्या तीन सामन्यात विजय मिळवला. मागच्या सामन्यात त्यांनी मलेशियाचा पराभव केला.