रिझर्व्ह बँकेकडून पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना रद्द

 

मुंबई (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेनं पुण्यातल्या सेवा विकास सहकारी बँकेचा परवाना काल रद्द केला आहे. त्यामुळं बँकेला आता कुठलेही व्यवहार करता येणार नाहीत.

बँकेचं कामकाज आटोपण्यासाठी आणि अवसायक नेमणुकीसाठी आवश्यक कारवाई करण्याची विनंतीही बँकेनं सहकार आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधकांना केली आहे. बँकेकडे पुरेसं भांडवल नाही, व्यवसाय वृद्धीची संधी नाही, तसंच बँक; बँकिंग नियमन कायद्याच्या तरतुदींची पूर्तता करत नसल्यामुळे परवाना रद्द करत असल्याचं रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.