राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्याची उपमुख्यमंत्र्यांची घोषणा

 


मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या प्रत्येक मतदार संघात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर राबवण्यात जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी सांगितलं आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. मागच्या काळात राज्य शासनाने डॉ. तात्याराव लहाने आणि त्याच्या चमूच्या नेतृत्वात १७ लाख शस्त्रक्रिया करून 'मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र अभियान' राबवलं होतं. त्याचप्रमाणे आज नागपूर इथं मेयो रुग्णालयात मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर होत असून, ५०० जणांवर ही शस्त्रक्रीया केली जाणार असल्याचं फडनवीस यांनी सांगितलं.