भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी - निर्मला सीतारामन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातील 5 जी ​​तंत्रज्ञान हे पूर्णपणे स्वदेशी असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. वॉशिंग्टनमधील जॉन्स हॉपकिन्स स्कूल ऑफ अॅडव्हान्स्ड इंटरनॅशनल स्टडीजच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सीतारामन यांनी ही माहिती दिली.

त्या म्हणाल्या की, भारत आता इतर देशांच्या आवश्यकतेनुसार कोणत्याही देशाला 5 जी तंत्रज्ञान देऊ शकतो.भारताचे 5-जी इतर कुठल्याही राष्ट्राकडून आयात केले नसून, ते भारताचे स्वतःचे उत्पादन असल्याचं त्यांनी सांगितलं.