राज्यातल्या सत्तासंघर्षावर घटनापीठात २७ सप्टेंबरला सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत घटनापीठापुढची सुनावणी आता येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. शिवसेना कोणाची याबाबत निर्णय घ्यायला निवडणूक आयोगाला मनाई करण्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी केलेल्या अंतरिम याचिकेची सुनावणी आज पाच न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे झाली.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती एम. आर. शाह, न्यायमूर्ती कृष्ण मुरली, न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिंव्ह यांनी दोन्ही गटाचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर २७ सप्टेंबर ही पुढील सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.