जम्मू काश्मीरच्या सर्व मतदारसंघांमधे मतदार याद्यांचं विशेष पुनर्निरीक्षण करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या सर्व मतदारसंघांमधे मतदार याद्यांचं विशेष पुनरिक्षण करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. अवलोकनार्थ मतदारांच्या छायाचित्रासह याद्या आज प्रसिद्ध झाल्या असून त्यावरच्या सूचना किंवा हरकती नोंदण्यासाठी २५ ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.

या याद्या जम्मू काश्मीर निवडणूक आयोग तसंच संबंधित शासकीय कार्यालयांच्या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील. हरकती आणि सूचनांचा निपटारा १० नोव्हेंबरपर्यंत करायचा आहे. आणि २५ नोव्हेंबरला अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध होतील. स्थलांतरित मतदारांच्या तक्रारी दिल्ली, जम्मू आणि उधमपूरच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे दाखल करता येतील.